वैभववाडी/-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऊस लागवड मोठया प्रमाणात सुरू आहे. सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांपासून लोकप्रतिनिधी पर्यंत ऊस शेती केली जात आहे.कोणत्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना थारा देऊ नये.लोकप्रतिनिधी आधी व गरीब शेतकऱ्यांचा ऊस मागाऊन तोडला जाणार नाही.ऊस तोड पाळी पत्रका प्रमाणेच केली जाणार आहे.ऊस तोडीमध्ये वाशीलेबाजीला थारा देणार नाही अशी माहीती सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी.वैभववाडी जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, गुलाराव चव्हाण, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई ,डी. वाय .पाटील साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जयदीप पाटील ,ऊस विकास अधिकारी एस .एस.पाटील ,सिंधुदुर्ग जिल्हा बँक स्थायी अधिकारी सर्जेराव यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळ व डी.वाय. पाटील साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची ऊस तोडणी बाबत आढावा बैठक झाली.या बैठकीत ऊस तोडणी करण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली.य 10 ते 25 ऑक्टोबर पर्यंत ऊस शेती लागवडीची पाहणी करण्यात येणार आहे.ऊस शेतीमध्ये तण मोठया प्रमाणात आहे.शेतकऱ्यांनी तण काढून ऊस तोडणीस योग्य करावा.27 ऑक्टोबर नंतर पहाणी करून त्यानंतर गेल्यावर्षीच्या तारखा प्रमाणे पाळी पत्रक गट कार्यालय व संबंधित सोसायटीच्या
कार्यालयात प्रसिद्ध केले जाणार आहे.या बाबत माहिती संबंधीत सोसायटीचे चेअरमन शेतकऱ्यांना देणार आहेत.ज्या शेतकऱ्यांच्या हरकती असतील त्या स्वीकारल्या जाणार आहेत.ज्या शेतकऱ्यांना अडचणी व शंका असतील त्या शेतकऱ्यांनी डी.वाय. पाटील साखर कारखान्याशी संपर्क साधावा.त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या तक्रारी दूर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवढ्या पासून पाळी पत्रक जाहीर केले येणार आहे .नोव्हेंबर महिन्यामध्ये ऊस तोडणी टोळ्याच्या अडचणी नसतील व शेतकरी संघटनांचा आंदोलन नसेल तर नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला ऊस तोडणीस प्रारंभ केला जाणार आहे.
ऊस तोडणी मध्ये दरवर्षीप्रमाणे नियोजन केले जाणार आहे.आर्थिक नियोजन झालेले आहे. पाळी पत्रका प्रमाणे ऊस तोडणी होणार आहे. कुठे वशिलेबाजी होणार नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे व लोकप्रतिनिधींच्या ऊसाची तोड पाळी पत्रकाप्रमाणे होणार आहे.
पुढे सावंत म्हणाले,गेल्या वर्षी वैभववाडी व कणकवली तालुक्यातील 83 हजार टन ऊस डी .वाय.पाटील साखर काराखाण्याला शेतकऱ्यांनी घातला होता.त्या ऊसाला 2800 रुपये प्रमाणे दर मिळाला होता.या वर्षी शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यात गेला की टीआरपी प्रमाणे गेल्या वर्षीच्या पेक्षा 150 रुपये जास्त दर दिला जाणार आहे.
कणकवली व वैभववाडी तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस पाळी पत्रका प्रमाणे तोडण्या बाबत चर्चा झालेली आहे.कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे.सर्व शेतकऱ्यांना सहकार्य केले जाईल.
फोटो:ऊस तोडणी बाबत पत्रकार परिषदेत बोलताना सतीश सावंत,दिगंबर पाटील,गुलाबराव चव्हाण व अन्य मान्यवर.छाया:(मोहन पडवळ)