मसुरे /-
दिवाळी सुट्टीच्या काळात शिक्षकांना स्वग्राम जाण्यासाठी व मुख्यालय सोडण्यासाठी विनाअट परवानगी मिळावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने अध्यक्ष संतोष पाताडे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या कडे केली आहे. .
कोविड १९ या महामारीचा सामना करण्यासाठी शासनाने घालून दिलेले नियम व अटी यांचे पालन करण्यासाठी सर्व प्राथमिक शिक्षक, लोकांमध्ये जनजागृतीचे काम प्रामाणिकपणे करत आहेत . कोरोना १ ९ च्या वाढत्या प्रादुर्भावमुळे व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परजिल्हयातील नागरिकांच्या कक्ष व्यवस्थापन ड्युटी गेले पाच ते सहा महीने प्राथमिक शिक्षक प्रामाणिकपणे बजावत आहेत . सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असलेले परजिल्हयातील शिक्षक चतुर्थी , दिवाळी व मे महिन्यात आपल्या मूळ गावी जात असतात . आज अनेक शिक्षकांना आपल्या कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते . तसेच गेली वर्षभर आपल्या कुटुंबापासून दूर आहेत . दिवाळी नंतर शाळा सुरू होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या मूळ गावी जाणे त्यांना अशक्य आहे . त्यामुळे त्यांना विनाअट परवानगी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.