कोरोना आपत्ती व्यवस्थापनाबाबत केली चर्चा..
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने आज रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हा शल्यचिकित्सक श्री.डॉ. श्रीमंत चव्हाण यांची भेट घेतली.यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष श्री.प्रसाद गावडे,कुडाळ तालुका सचिव राजेश टंगसाळी,अणाव सरपंच आपा मांजरेकर,उपतालुकाध्यक्ष अविनाश अणावकर,विभाग अध्यक्ष प्रणील अवसरे, ओरोस कोरना मदत केंद्राचे केंद्रप्रमुख सचिन मयेेकर, संतोष मोरजकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना आपत्ती आरोग्य व्यवस्थापन आणि संपूर्ण आरोग्य यंत्रणा सुधारणांच्या दृष्टीने मनसेच्या शिष्टमंडळाने सकारात्मक चर्चा केली.सामान्य जनतेस रुग्णालयात चांगली सेवा मिळण्याच्या दृष्टीने सेवाभावी कारभार केल्यास मनसे सर्वोत्तपरी सहकार्य करेल अशी ग्वाही यावेळी महाराष्ट्र सैनिकांनी दिली.