वेतोरे वरचीवाडी ग्रा.पं.ग्रामसेवक भूषण चव्हाण यांची आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड  वेंगुर्ला

वेतोरे वरचीवाडी ग्रा.पं.ग्रामसेवक भूषण चव्हाण यांची आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड वेंगुर्ला

वेंगुर्ला /-

जि.प.चे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर झाले असून वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे वरचीवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भूषण दत्तात्रय चव्हाण यांची वेंगुर्ले तालुक्यातून आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी निवड झाली आहे.जिल्हास्तरीय प्रशासकीय समितीने ही निवड केली असून त्यांचे तालुक्यातून अभिनंदन होत आहे.

वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे वरचीवाडी ग्रामपंचायत येथे कार्यरत असलेले भूषण चव्हाण यांनी सन २०१९-२० या वर्षी ग्रा.प.योजना प्रभावीपणे राबविल्या.स्वछताविषयक उपक्रम,तसेच कोव्हीड कालावधीत प्रतिबंध उपाययोजनाबाबत चांगले काम केले.विलगीकरणात व्यक्तीसाठी योग्य नियोजन करून चांगल्या सुविधा पुरविल्या.परिसर स्वच्छता तसेच इतर ग्रा.प.योजना प्रभावीपणे राबविल्या.याबाबत पंचायत समिती सभापती,गटविकास अधिकारी, ग्रा.प.विस्तार अधिकारी,सरपंच तसेच गावातील पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे हा पुरस्कार मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

अभिप्राय द्या..