देवगड /-
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्या तरी शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. याच बरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी माध्यमिक विद्यामंदिर साळशी येथे महात्मा गांधी जयंती सप्ताहनिमित्त ऑनलाईन रांगोळी, हस्ताक्षर व भाषण स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये रांगोळी स्पर्धेत नैसर्गिक पाना फुलांच्या पाकळ्या, गवत दगड यांचा वापर करून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक ऋग्वेद साटम, द्वितीय क्रमांक विश्राम परब, तृतीय क्रमांक रिया भोगले तर, मोठ्या गटात प्रथम क्रमांक चिन्मयी घाडी, द्वितीय क्रमांक विशाल भिसे, तृतीय क्रमांक राज साळसकर यांनी प्राप्त केला आहे. तर हस्ताक्षर स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक रिया भोगले, द्वितीय क्रमांक मनोज भोगले तृतीय क्रमांक अर्थव राणे तर मोठ्या गटात प्रथम क्रमांक तन्वी सावंत, द्वितीय क्रमांक चिन्मयी घाडी, तृतीय क्रमांक लोचन देवणे यांनी प्राप्त केला आहे तर महात्मा गांधी यांचे जीवनकार्य व जीवनप्रसंग यांच्यावरील ऑनलाईन भाषण स्पर्धेत लहान गटात प्रथम क्रमांक रिया भोगल, द्वितीय क्रमांक काजल घाडी तर मोठ्या गटात प्रथम क्रमांक हर्षाली पवार, द्वितीय क्रमांक तन्वी सावंत, तृतीय क्रमांक राज साळसकर याने प्राप्त केले आहे. स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्याना पुरुषोत्तम साटम या शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थाध्यक्ष चंद्रकांत पारधी, सचिव जे. डी. नाईक, चेअरमन सत्यवान सावंत व पदाधिकारी, मुख्याध्यापक माणिक वंजारे, सहाय्यक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले आहे.