मुडेश्वर मैदानाजवळ वापरलेली पीपीई किट, हँडग्लोज रस्त्यालगत टाकल्याचा धक्कादायक प्रकार..

मुडेश्वर मैदानाजवळ वापरलेली पीपीई किट, हँडग्लोज रस्त्यालगत टाकल्याचा धक्कादायक प्रकार..

कणकवली /-

कणकवली शहरालगत हरकूळ बुद्रुक येथे चार दिवसांपूर्वी वापरलेली पीपीई किट उघड्यावर आढळून आले होते. पुन्हा मुडेश्वर मैदानाकडे वापरलेली पीपीई किट, हँडग्लोज रस्त्यालगत टाकल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

हरकूळ बुद्रुक येथे कोविड केअर सेंटर असून या सेंटर पासून अवघ्या काही अंतरावर हे पीपीई किट व हँडग्लोज सापडले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.संबंधितांवर कारवाई करा ,अशी मागणी केली जात आहे.

अभिप्राय द्या..