वैभववाडी /-
वैभववाडी तालुक्यात कोरोना संसर्ग वाढत आहे.आता पर्यंत 129 रुग्ण कोरोना बाधीत आहेत.तर 108 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत.16 रुग्ण सक्रिय असून उपाचार घेत आहेत.तर आता पर्यंत 5 किरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शुक्रवारी ऐनारी येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे.कोरोना बाधित 5 रुग्ण सांगूळवाडी येथील कोविड सेंटरमध्ये उपाचार घेत आहेत.तर 10 रुग्ण घरी उपचार घेत आहेत.कणकवली उपजिल्हा रुग्णालयात 1 कोरोना पॉझिटिव्ह उपचार घेत आहे.
तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पुन्हा वाढत असल्याने नागरिकांमधून भीती व्यक्त केली जात आहे.