सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट सुरू.;राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर,आ.वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उद्घाटन

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट सुरू.;राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर,आ.वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उद्घाटन

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना.उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या पुढाकाराने सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात अद्ययावत अशा ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात आली आहे. या ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन आज राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते फित कापून व श्रीफळ वाढवून करण्यात आले.
कोविड१९च्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी पालकमंत्री ना.उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या पुढाकाराने शासनाच्या माध्यमातून ७२ लाख रु खर्च करून अद्ययावत अशा ऑक्सिजन प्लांट ची उभारणी करण्यात आली आहे.मोठ्या ५८ बाटली भरण्याची या प्लांटची क्षमता आहे.त्यामुळे कोरोनाच्या काळात जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही.सद्यस्थितीत कोविड रुग्णांना त्याचा मोठा लाभ होणार आहे असे आ.वैभव नाईक यांनी सांगितले.
याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय चाकूरकर, अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ शाम पाटील, फिजिशियन डॉ नागेश पोवार शिवसेना नेते संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते,जि.प गटनेते नागेंद्र परब, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत,अवधूत मालवणकर, संदेश पटेल,वेंगुर्ला सभापती सौ.जाधव, अनुप्रिया कांबळी,वेंगुर्ले उपनगराध्यक्षा सौ. अस्मिता राऊळ, माजी नगराध्यक्ष सुनील डूबळे,म्हाडा सदस्य सचिन वालावलकर, नागेश ओरोसकर,आदिंसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते ,वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..