दोडामार्ग/-
शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून कार्यवाही केली त्यासाठी या अधिकारी वर्गावर कारवाई व्हावी तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी प स सदस्य बाळा नाईक यांनी हे आमरण उपोषण पुकारले या उपोषणाला महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी भेट दिली.
मांगेली सरपंच सूर्यनारायण गवस यांच्यावर इतर सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. कंटेंटमेन्ट झोन मधील सदस्य एकनाथ गवस हे सभागृहात हजर राहिले होते. हे सर्व तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांसमोर घडले त्यांनी शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून ही कार्यवाही केली. त्यासाठी या अधिकारी वर्गावर कारवाई व्हावी तसेच या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी प स सदस्य बाळा नाईक यांनी हे आमरण उपोषण पुकारले आहे.अधिकारी जर मुजोर झाले असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही लवकरच कारवाई केली जाईल असे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडून सांगण्यात आले.
यावेळी भाजपा नेते अतुल काळसेकर, बांदा माजी सरपंच मंदार कल्याणकर, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष चेतन चव्हाण,माजी शहराध्यक्ष समीर रेडकर, यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.