वैभववाडी/-
वैभववाडी तालुक्यातील एका महिला डॉक्टरशी गैरवर्तन करणा-या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील यांना पोलिसांनी तात्काळ अटक करावी. डॉ. पाटील यांनी महिला वैद्यकीय अधिकारीका-यांशी केलेले वर्तन धक्कादायक आहे. त्यांच्या या दुष्यकृत्यामुळे संपुर्ण वैद्यकीय क्षेत्र बदनाम झाले आहे. त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी आपण राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन करणार असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हा निरीक्षक तानाजी कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
याप्रकरणी वैभववाडी पोलीसांनी डॉ. उमेश पाटील यांना तात्काळ ताब्यात घेवून विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी तात्काळ अटक करुन पर्दाफाश करावा. अधिकाराचा गैरवापर करून योजनाबद्ध पद्दतीने महिला डॉक्टरला जाळ्यात अडकवून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा डॉ. उमेश पाटील यांचा डाव होता. असा आरोपही तानाजी कांबळे यांनी केला आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील यांच्या कडून महिला वैद्यकीय अधिकारीका-यांशी केलेले गैरवर्तन असा कुणावर प्रसंग ओढवला असेल आणि भीतीमुळे, बदनामीला घाबरुन कुणी तक्रार द्यायला पुढे येत नसेल तर डाँ. उमेश पाटील यांच्यासारखे गैरकृत्य करणारे समाजात उथळ माथ्याने फिरत राहतील. तेव्हा कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता अशा स्वरुपाच्या तक्रारी पुढे येवून कराव्यात असे आवाहनही त्यांनी केले आहे.
याप्रकरणी आपण राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख तसेच आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांची आपण लवकरच भेट घेणार असून महिला वैद्यकीय अधिकारीका-यांशी गैरवर्तन करणा-या तालुका वैद्यकीय अधिका-यावर कठोर कारवाई करावी. त्यांच्या दृष्ट्कृत्यामुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र बदनाम झाले आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करणार आहे. त्यांना तात्काळ अटक करून ताब्यात घ्यावे असे आवाहन तानाजी कांबळे, प्रकाश सावंत यांनी केले आहे.