विनयभंग करणा-या तालुका आरोग्य अधिका-याला तात्काळ अटक करा ! वैभववाडी मनसेची मागणी

विनयभंग करणा-या तालुका आरोग्य अधिका-याला तात्काळ अटक करा ! वैभववाडी मनसेची मागणी

वैभववाडी /-

महिला डाँक्टरशी गैरवर्तन करणाऱ्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील याला तत्काळ अटक करा.वैभववाडी मनसेच्यावतीने पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना निवेदन देण्यात आले.
तालुका आरोग्य अधिकारी याने महिला डाँक्टरशी केलेले वर्तन अशोभनीय आहे.उच्चभ्रू व सुशिक्षित डाँक्टरांकडून अशी अपेक्षा नाही.डॉक्टरच असे वागु लागले तर माता- भगीनींनी कोणावर विश्वास ठेवावा.यामुळे डॉक्टर पेशाला काळीमा लागला आहे. डाँक्टरच्या अशा कृत्यामुळे महीला वर्गाने उपचारासाठी जावं की नाही, अशी द्विधा मनस्थीती झाली आहे. महिला सहका-यासोबतच डाँक्टर असे वागत असतील तर इतर महीलांच्या बाबतीत याच्याकडून काय अपेक्षा ठेवायची, पोलिसांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता सखोल चौकशी करावी.फरार असलेल्या त्या डाँक्टरला तात्काळ अटक करावी ,अन्यता मनसेच्या वतीने जन आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे. या वेळी मनसे वैभववाडी तालुका अध्यक्ष सचिन तावडे, उपतालुका अध्यक्ष दिपक पार्टे, तालुका सचिव महेश कदम, विभागीय अध्यक्ष विनोद विटेकर, चंद्रकांत पार्टे उपस्थित होते.

अभिप्राय द्या..