वेंगुर्ला /-

राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटिल यड्रावकर आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर असुन त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य विषयक सोयी सुविधा तसेच कोविड १९ संदर्भात शासकीय विश्रामगृहात येथे आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोविड रुग्णावर केले जाणारे औषधोपचार,कोविड केअर सेंटर,कोविड नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत केल्या जाणार्‍या उपाययोजना,औषधसाठा तसेच जिल्ह्यातील आरोग्य सोयीसुविधांचा आढावा घेतला.
यावेळी वेंगुर्ले पंचायत समिती सभापती अनुश्री कांबळी आणि वेंगुर्ले नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ यांनी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटिल यड्रावकर यांची भेट घेत वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयासाठी व्हँन्टिलेटर,अल्टरासाउंड मशिन, आँक्सीजन,एक्सरे मशिन अशा मशनरींची आवश्यकता असुन वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाला आणि शिरोडा येथिल उपजिल्हा रुग्णालयाला स्वतंत्र रुग्णवाहिका मिळावी तसेच तालुक्यातील परुळे आणि आडेली प्राथमिक आरोग्य केंद्राना रुग्णवाहिका मिळावी, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत येणारी वर्ग रिक्त पदे त्यात डाँक्टर,नर्स, यांचे सह तांत्रिक अतांत्रिकपदे, कार्यालयिन पदे तात्काळ भरण्यात यावीत अशी मागणी आरोग्य राज्यमंत्री यांचेकडे केली आहे. यावेळी त्यांनी रिक्त पदासंदर्भात येत्या मंगळवारी मुंबईमध्ये आमदार वैभव नाईक आणि आपण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले.रुग्णवाहिका संदर्भातील आपली मागणी आणि सुसज्ज मशिनरी उपलब्ध करून देण्याबाबतची आपली मागणी पुर्ण करण्यासंदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.
या बैठकीप्रसंगी आमदार वैभव नाईक,जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी,जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे,जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय चाकूरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, डॉ.वालावलकर,डॉ. झाट्ये,शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते संदेश पारकर, जि.प गटनेते नागेंद्र परब, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, अवधूत मालवणकर,संदेश पटेल,सचिन वालावलकर,सुनील डुबळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page