वैभववाडीतील वृध्दाचे कोरोनामुळे निधन : बळींची संख्या 5.

वैभववाडीतील वृध्दाचे कोरोनामुळे निधन : बळींची संख्या 5.

वैभववाडी /-

वैभववाडी शहरातील एका वृद्धाचा मंगळवारी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वैभववाडी तालुक्यात आतापर्यंत 5 जण कोरोनाचे बळी ठरले आहेत. तर मंगळवारी रात्री पुन्हा 6 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी दिली आहे.
शहरातील त्या वृध्दाची तब्येत खालावल्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालय ओरोस येथे दाखल करण्यात आले होते. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मंगळवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. तर मंगळवारी प्राप्त अहवालातील 6 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वैभववाडी 1, आचिर्णे 1, ऐनारी 4, या रुग्णांचा समावेश आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तालुक्यात 128 इतकी झाली आहे.

अभिप्राय द्या..