वैभववाडी शहरात विना मास्क फिरणाऱ्या 40 जणांवर दंडात्मक कारवाई..

वैभववाडी शहरात विना मास्क फिरणाऱ्या 40 जणांवर दंडात्मक कारवाई..

वैभववाडी /-

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी शहरांमध्ये पोलीस विभाग व वाभवे – वैभवाडी नगरपंचायत यांच्यावतीने बुधवार 30 सप्टेंबर रोजी बाजारामध्ये विना मास्क फिरणाऱ्या 40 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

वैभववाडी शहरांमध्ये गेले काही दिवस कोरोना संसर्गामुळे किरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे .या पार्श्वभूमीवर वैभववाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वैभववाडी शहरातील संभाजी चौक व दत्त मंदिर चौक याठिकाणी पोलीस बंदोबस्त लावून शहरांमध्ये दुचाकी ,अन्य वाहनातून किंवा बाजारामध्ये विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तींवर प्रत्येकी 200 रुपये याप्रमाणे बुधवारी बाजारा दिवशी दिवसभरात 40 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई वैभववाडी तालुका वाहतूक विभागाचे पोलीस श्री. राठोड व नगर पंचायतीचे कर्मचारी यांनी केली.

अभिप्राय द्या..