कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज बुधवारी २५ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ४ रुग्ण तर ओरोस ९ रुग्ण आढळले आहेत. तर तालुक्यात आतापर्यंत ८५० रुग्ण सापडले आहेत.कुडाळ तालुक्यात आज बुधवारी २५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले.तसेच तालुक्यात ३०० एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी २४१ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या ५९ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकुण रुग्ण ८५० तर बरे झालेले रुग्ण ४६४ आणि सक्रिय रुग्ण ३६३ आहेत. आतापर्यंत तालुक्यात २३ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page