मसुरे /-

मसुरे गावचे सुपुत्र, ज्येष्ठ कामगार नेते, जयवंत जी परब साहेब यांचे नुकतेच मुंबई येथे निधन झाले होते. मालवण कुडाळ विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार माननीय वैभवजी नाईक साहेब यांनी मुंबई अंधेरी डी एन नगर येथील स्वर्गीय जयवंत जी परब साहेब यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.
जयवंत जी परब साहेब हे आपल्या परिवारातील एक सदस्य होते. तसेच ते आम्हा सर्वांचे मुख्य मार्गदर्शकही होते. यापुढेही मी आणि शिवसेना पक्ष तुमच्या सोबत सदैव आहोत. तुमच्या दुःखात सिंधुदुर्गातील संपूर्ण शिवसेना परिवार सहभागी आहे. परब साहेबांच्या आकस्मिक निधनाने शिवसेना आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची मोठी आणि झाली आहे ही हानी भरून काढण्यास आम्हा सर्वांना वेळ लागणार आहे या दुःखद प्रसंगात परमेश्वर संपूर्ण परब परिवाराला सावरण्याची ताकद देवो ही ईश्वर चरणी प्रार्थना असे यावेळी सांत्वनपर भेटीदरम्यान आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. यावेळी स्वर्गीय जयवंत जी परब यांचे बंधू प्रकाश परब, सुनील परब पत्नी शोभा परब व संपूर्ण परिवाराचे सांत्वन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page