✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी.
सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव- म्हापसेकरवाडी येथील एकाने गळफास लावून आत्महत्या केली.ही घटना सकाळी उघड झाली.आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.रामचंद्र तुकाराम म्हापसेकर (वय ५३) रा. कोलगाव असे मृताचे नाव आहे. याबाबतची खबर त्यांचे भाऊ साबाजी म्हापसेकर यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे.त्यानुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबतची माहिती ठाणे अंमलदार डुमिंग डिसोजा यांनी दिली.