▪️महाराष्ट्र वित व लेखा या वर्ग १ च्या सहायक सचालक पदी निवड..
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी.
वेंगुर्ला तालुक्यातील परुळे- कर्ली येथील तृप्ती कृष्णा टेमकर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होत तिची महाराष्ट्र वित व लेखा या वर्ग १ च्या सहायक सचालक पदी निवड झाली आहे . जिल्हा परिषदेच्या ग्रामपचायत विभागात हवालदार पदावर काम करणारे कर्मचारी कृष्णा टेमकर यांची ती कन्या असून तिच्या या यशाबद्दल तिचे व तिच्या वडिलांचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रीत नायर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे व ग्रामपचायत विभाग कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
तृप्ती टेमकर हिने न्यू इंग्लिश स्कुल ओरोस येथे प्राथमिक शिक्षण घेतले त्यानंतर दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूर तिठा ,व संत राऊळ महाराज वरिष्ठ महाविद्यालय कुडाळ या ठिकाणी पुढ शिक्षण घेतले त्यानंतर तीने लेखाधिकारी पांडुरंग थोरात यांचे मार्गदर्शन घेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत वरिष्ठ पदावर तिची निवड झाली आहे याबद्दल तिचे लेखाधिकारी पांडुरंग थोरात ,वैभव मांजरेकर यांनी तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.