✍🏼लोकसंवाद /- मसुरे.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेला मान देऊन मेडिकल कॉलेजचे शिक्षण मराठीतूनच देण्यासाठी शासन स्तरावर ती योग्य ती कार्यवाही व्हावी आणि यावर्षीपासून मातृभाषेतूनच मराठीतून शिक्षण सुरू व्हावे अशी मागणी मानवता विकास परिषद मुंबई च्या वतीने एक निवेदन संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी निवासी उप जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आणि सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजचे डीन प्रकाश डी गुरव
यांना देऊन या प्रश्नाबाबत लक्ष वेधले आहे.याबाबत लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्य आरोग्य मंत्री, केंद्रीय आरोग्य मंत्री, माननीय पंतप्रधान यांनाही निवेदन देऊन या प्रश्नाबाबत लक्ष वेधण्यात येणार असल्याची माहिती श्रीकांत सावंत यांनी यावेळी दिली.
मातृभाषेतून शिक्षण झाले तर खेड्या खेड्यातून डॉक्टर शिक्षणासाठी तयार होतील. याचा लाभ तळागाळातील विद्यार्थ्यांना होणार आहे आणि यातूनच खेड्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे. आपल्या मराठी माध्यमातून वैद्यकीय शिक्षण सुरू केल्यास याचा लाभ खऱ्या अर्थाने कोकणातील सर्व विद्यार्थ्यांना होणार आहे. यासाठी शासन स्तरावरती योग्य तो पाठपुरावा करण्यासाठी मानवता विकास परिषद च्या वतीने पुढाकार घेण्यात येणार आहे अशी माहिती मानवता विकास परिषदचे संस्थापक अध्यक्ष मसुरे गावचे सुपुत्र श्रीकांत सावंत यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते नामदेव मठकर आणि मानवता विकास परिषदचे सदस्य उपस्थित होते.