✍🏼लोकसंवाद /- कणकवली.

आमदार नितेश राणेंनी पुन्हा उ. बा. ठाकरें सेनेला आणखी एक दणका दिला असून कणकवली विधानसभा मतदारसंघातील साकेडी ग्रा पं च्या ठाकरे शिवसेनेच्या सदस्य समीक्षा संतोष परब, साकेडी गावचे उपशाखाप्रमुख संतोष परब यांनी आ. नितेश राणेंच्या उपस्थितीत सूरज यादव, वसीम शेख या शिवसैनिकांसह भाजपात प्रवेश केला. ओम गणेश बंगल्यावर हा पक्षप्रवेश आज सकाळी झाला. ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या ग्रा पं निवडणूकीत ठाकरे शिवसेना पक्ष पुरस्कृत समीक्षा परब या ग्रापं सदस्यपदी निवडून आल्या होत्या. परब दाम्पत्याने केलेल्या पक्षप्रवेशामुळे साकेडीत भाजपाची ताकद वाढली असून ठाकरे सेना आणखी कमजोर झाली आहे. यावेळी साकेडी सरपंच सुरेश साटम, संदिप सावंत, उपसरपंच वर्दम प्रज्वल, माजी सभापती संजय शिरसाट, रमाकांत सापळे, पंढरीनाथ ढवण, रविंद कोरगावकर, अजित शिरसाट, प्रशांत जाधव, राजू म्हसकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page