वैभववाडी /-
कोविड 19 नियंत्रणासाठी व बाधित लोकांचा मृत्यू दर कमी करण्यासाठी शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ कोरोना मुक्त महाराष्ट्र ही मोहीम सर्वत्र राबविली जात आहे .वैभववाडी तालुक्यामध्ये 11465 कुटुंबे आहेत .त्या सर्व कुटूंबाचा आरोग्य विषयी सर्व्हे सुरू आहे.वैभववाडी तालुक्यात या मोहिमेला 16 सप्टेंबर पासून सुरुवात करण्यात आली आहे.आतापर्यंत 7,552 कुटुंबांचा आरोग्य विभागामार्फत घरोघरी जाऊन आरोग्याचा सर्वे करण्यात आलेला आहे. या आरोग्य सर्व्हेमध्ये तालुक्यातील 6 व्यक्तींचे स्वब घेण्यात आले होते. त्यापैकी 4 व्यक्तींचे स्वब कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य विस्तार अधिकारी आनंदा चव्हाण यांनी दिली. वैभववाडी तालुक्यामध्ये सध्या वैभवाडी शहर,तालुक्यातील सर्व गावागावातील वाडी – वस्त्यांमध्ये आरोग्य कर्मचारी जाऊन लोकाची आरोग्य कर्मचाऱ्यांकडून भेट घेऊन कोरोना होऊ नये म्हणून प्रत्येकाला आरोग्य शिक्षण दिले जात आहे .
वैभववाडी तालुक्यामध्ये माझे कुटुंब नाझी जबाबदारी या अभियानामध्ये वैभववाडी गटविकास अधिकारी विद्या गमरे,सहाय्यक गटविकास अधिकारी शुभदा पाटील यांनी कार्यक्षेत्रात आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
या मोहिमेत तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 33 टीमचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये 10 डॉक्टर,8 आरोग्य सेवक,20 आरोग्य सेविका ,45आशा , 17 अर्ध वेळ परिचर, 8 पर्यवेक्षक,स्वयंसेवक असे 90 अधिकारी व कर्मचारी सहभागी आहेत. इत्यादी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे .
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जनतेने स्वतःचे संरक्षण स्वतः करायचे आहे. घरातून बाहेर जाताना मास्क,चा वापर करावा ,हॅन्ड ग्लोज ,सॅनिटायझरचा यांचाही वापर करावा ,सोशल डीस्टनसिंग चा वापर करणे,कोरोना प्रतिबंधात्मक माहिती तालुक्यातील गावोगावी व घरोघरी जाऊन दिली जात आहे. थर्मस स्कॅन मशीन द्वारे व्यक्तीच्या शरीरातील तापमान किती आहे याची माहिती घेतली जाते. ऑक्सी मिटर मधून शरीरातील ऑक्सीजन ची लेव्हल किती आहे याची तपासणी करण्यात येत आहे.प्रत्येक व्यक्तीने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे. याबाबतही आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन जनजागृती केली.
या मोहिमे मध्ये तालुक्यातील सर्व गावातील जनतेने चांगल्या प्रकारचे सहकार्य केलेले आहे. यापुढेही लोकप्रतिनिधी ,शासकीय कर्मचारी व जनतेने कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे ,काही व्यक्ती मधुमेह ,किडनी आजार ,लठ्ठपणा, दमा, किंवा इतर मोठे आजार असणाऱ्या व्यक्तींची spo2 ही तपासणी करून खात्री करण्यात येणार आहे .तसेच एखाद्या व्यक्तीचे तापमान 98.5 अंश 13 फॅरा व 100 फॅरा असेल तर अशा रुग्णांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे.अशी माहिती तालुका आरोग्य विस्तार अधिकारी आनंदा चव्हाण यांनी दिली.