कोल्हापूर /-

श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्था इंचलकरजी ( ता हातकणंगले ) यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या कोरोना महामारीत हजारो लोकांना मोफत अन्न ,धान्य औषधे मास्क, चे वाटप करून उपेक्षितांना मदतीचा हात देत कोरोना योद्धा म्हणून लढणा-या अंनतशाती बहुउद्देशिय सामाजिक सेवा संस्था कोल्हापूर व कसबा वाळवे या संस्थेला राज्यस्तरीय कोरोना योध्दा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

कोरोची ता हातकणंगले, दत्तमदिर हाॕल येथे पुरस्कारांचे वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी “लागिर झालं जी “फेम आभिनेञी मंजुषा खेत्री, ,जेष्ठ आभिनेते प्रकाशचंद्र शिंदे.आदी मान्यवराच्या हस्ते अनंतशांती संस्थेचे संस्थापक भगवान गुरव व संचालक प्रमोद पाटील यांना कोरोना योद्धा पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले . यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाँट फिल्मचे उदघाटन करण्यात आले.
कार्यक्रमास जयप्रकाश परुळेकर ,आभिनेता विर राहुल राजशेखर ,आखिल भारतीय मराठी चिञपट महामंडळ कोल्हापूर उपाधाक्ष धनाजी यमगर , तुझ्यात जीव रंगाला मालिकेतील छाया सांगावकर, शहापुर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रकाश निकम ,उपनिरिशक रांजेद्र यादव, अध्यक्षा डॉ माधुरी खोत ,सचिव अरुणा पाटिल आदी उपस्थित होते
स्वागत श्री अमित काकडे अध्यक्ष यांनी केले तर आभार धनाजी रावसाहेब भोसले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page