विरोधी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचा केला सुफडा साफ.

लोकसंवाद /- कुडाळ.

केरवडेतील येथील गेली पंधरा वर्षे सुरु असलेला राणे समर्थक आणि मनसे कार्यकर्त्यांमधील वाद या निवडणुकीत एकत्रित मिटवून गावच्या विकासासाठी संपुष्टात आणला गेला. गावातील थोरामोठ्यांच्या मध्यस्थीने मनसे माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब आणि कट्टर राणे समर्थक राजू मल्हार यांच्यातील वाद मिटवला. त्याची परिनीती म्हणजे आजचा दणदणीत विजय. मनसे व बीजेपी यांनी एकत्रित पॅनल करून निवडणूक लढवून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पुरस्कृत पॅनलचा आठ शून्य असा दारूण पराभव केला. सरपंच पदी मनसेच्या सौ. श्रिया ठाकूर विराजमान झाल्या असून प्रभाग क्रमांक एक मधून वासुदेव भोई (भाजप ),संजना भोई (मनसे), दत्ता जाधव (भाजप), तर प्रभाग क्रमांक दोन मधून श्वेता कोरगावकर (मनसे) ,श्रावणी नाईक (मनसे) प्रभाग क्रमांक तीन मधून अर्जुन परब (भाजप) चित्रा हडपी (भाजप) असे उमेदवार बहुमताने विजयी झाले .या निवडणुकीत शिवसेना पॅनलच्या वतीने आमदार वैभव नाईक व संजय पडते यांनी शर्तीचे प्रयत्न केले होते . सदर निवडणुकीत विजयी पॅनलच्या वतीने धीरज परब यांच्यासह राजू मल्हार , श्रावण बांदेलकर ,अशोक बांदेलकर ,विवेक बांदेलकर, विठू भोई ,नितीन मल्हार, दिलीप सावंत, मंगेश ठाकूर, राजन चव्हाण, विशाल परब, सुशांत परब ,सुबोध परब, सिद्धेश परब,प्रथमेश धुरी, बाळा पावसकर ,सुशील ठाकूर ,सुनील ठाकूर, सुहास नाईक, सचिन गुंड ,संतोष नाईक ,आदीने प्रचाराची धुरा सांभाळली होती. सर्व नवनिर्वाचित विजयी उमेदवारांचे ग्रामस्थांनी श्री देव जगन्नाथ मंदिर कडे फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत केले. व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या सर्व मतदार बंधू भगिनींचे विजयी उमेदवारांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page