You are currently viewing नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या हस्ते श्रीधर नाईक उद्यानाचे झाले लोकार्पण..

नगराध्यक्ष समीर नलावडेंच्या हस्ते श्रीधर नाईक उद्यानाचे झाले लोकार्पण..

कणकवली /-

शहरातील 75 लाख निधी खर्चून नूतनीकरण करून बांधण्यात आलेल्या कै.श्रीधर नाईक उद्यानाचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी अवधूत तावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, राष्ट्रवादी काँग्रेस नेता तथा नगरसेवक अबिद नाईक, बांधकाम सभापती ऍड.विराज भोसले, आरोग्य सभापती संजय कामतेकर, नगरसेवक बाबू गायकवाड, शिशिर परुळेकर, नगरसेविका मेघा सावंत, कविता राणे, प्रतीक्षा सावंत, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, रोटरी क्लब अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, दीपक बेलवलकर, उद्यानाचे ठेकेदार भोसले इंडस्ट्रीजचे प्रताप भोसले, एम्पायर ग्रुप चे संतोष चव्हाण, दादा कुडतरकर, रवींद्र मुसळे, गुरू पावसकर, राजश्री धुमाळे, प्राची कर्पे, भरत उबाळे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगराध्यक्ष नलावडे म्हणाले, की कै. श्रीधर नाईक यांचा आज 31 वा स्मृतिदिन आहे. श्रीधर नाईक यांच्या स्मृतिदिनी या उद्यानाचे उदघाटन व्हावे यासाठी सत्ताधारी व विरोधी सर्व नगरसेवकांनी एकमताने मान्यता दिली होती. आज हे गार्डन कणकवली शहरवासीयांसाठी खुले झाले आहे. गार्डन लगत असणारी राखीव जागा संपादित करून हायवे चौपदरीकरणानंतर सध्या उरलेल्या 9 गुंठे जागेत असलेले हे गार्डन भविष्यात आणखी विस्तारित स्वरूपात शहरवासीयांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कणकवली शहर विकास करताना कुठलाही राजकीय पक्षभेद आम्ही करणार नाही. शहरविकासासाठी निधी देणाऱ्या आमच्या सत्ताधारी तसेच विरोधी गटाच्या सर्व लोकप्रतिनिधींचे नेहमीच स्वागत आहे. उदघाटनानंतर बच्चे कंपनीने गार्डन मधील खेळण्यांवर बसून आनंद लुटला.

अभिप्राय द्या..