You are currently viewing आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ येथील वाचनालय व महिला मंडळास संगणक संच प्रदान.;कुडाळ शिवसेनेच्या वतीने क्रीडा संकुल येथे वृक्षारोपण.

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून कुडाळ येथील वाचनालय व महिला मंडळास संगणक संच प्रदान.;कुडाळ शिवसेनेच्या वतीने क्रीडा संकुल येथे वृक्षारोपण.

कुडाळ /-

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कै. सौ. विजया वामन पाटणकर वाचनालय व ग्रंथ संग्रहालय कुडाळ तसेच महिला मंडळ कुडाळ या संस्थेस संगणक संच प्रदान करण्यात आले. त्याचबरोबर कुडाळ शिवसेनेच्या वतीने आ.वैभव नाईक यांच्या हस्ते कुडाळ क्रीडा संकुल येथे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, शहरप्रमुख संतोष शिरसाट, उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, अतुल बंगे, संजय भोगटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, युवासेना जिल्हा समन्वयक सुशील चिंदरकर, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, नगरसेविका श्रेया गवंडे,सई काळप, श्रुती वर्दम, संतोष अडूळकर, रुपेश पावसकर, सचिन काळप, राजू गवंडे, अब्बास करोल ,गुरु गडकर, चेतन पडते, महिला मंडळ कुडाळच्या मेघा सुकी, वाचनालयाच्या अध्यक्षा प्रतिभा पाटणकर, विठ्ठल पाटणकर, ग्रंथपाल प्रसाद जाधव, लिपिक अस्मिता कुडाळकर, बापू सावंत आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..