You are currently viewing मेडिकल व्यावसायिकावर अज्ञात चोरट्यांचा मॉर्निंग वॉकला गेला असता हल्ला,अंगठी,मोबाईल चोरून हल्लेखोर पसार कासार्डेतील घटना..

मेडिकल व्यावसायिकावर अज्ञात चोरट्यांचा मॉर्निंग वॉकला गेला असता हल्ला,अंगठी,मोबाईल चोरून हल्लेखोर पसार कासार्डेतील घटना..

कणकवली /-

तालुक्यातील कासार्डे येथे मुंबई-गोवा महामार्गावर एका व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला झाला. कासार्डे तिष्ठ्ठा ओव्हर ब्रीजवर तळेरे येथील मेडिकल व्यावसायिक जगदीश डंबे (रा. कासार्डे जांभळगाव) हे पाचच्या सुमारास मॉर्निंग वॉकला गेले होते. कासार्डेहून तळेरेच्या दिशेने जाणाऱ्या लेनवर दुचाकीवरून तीन अज्ञातांकडून चाकूचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. यावेळी प्रतिकार केल्यानंतर त्यांच्यांवर प्राणघातक हल्ला झाला. डंबे यांच्या नाकावर चोरट्यांनी ठोसा लावत जखमी केले. हातातील सोन्याची अंगठी व पैसै हुसकावण्यासाठी पोटात सुरा घुसवण्याचा प्रयत्न केला. मात्र डंबे यांनी प्रतिकार केला.डंबे यांनी आरडाओरडा केल्यानंतर दुचाकीवरून आलेले ते तीन जण सुमारे ३२ हजारांचा मोबाईल,हातातील अंगठी घेऊन कणकवलीच्या दिशेने पसार झाले. या हल्ल्यात डंबे यांच्या नाकावर जखम झाल्याने ते रक्तबंबाळ झाले होते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत जखमी डंबे यांना कासार्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करत प्रथमिक उपचार केले.

अभिप्राय द्या..