You are currently viewing उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत पाट विद्यालयाचे घवघवीत यश.विद्यालयाचा एकूण निकाल ९७.९५ टक्के

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत पाट विद्यालयाचे घवघवीत यश.विद्यालयाचा एकूण निकाल ९७.९५ टक्के

विज्ञान विभाग १०० टक्के,वाणिज्य विभाग ९८.६३टक्के तर कला विभाग९०.३२टक्के.

कुडाळ /-

एस.के.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस.एल.देसाई विद्यालय पाट व कै. सौ. सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालय ,पाट आणि डाॕ.विलासराव देसाई महाविद्यालय,पाट

दिनांक ०८जून २०२२ रोजी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात कै.सौ.सिताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालय पाटचा एकूण निकाल ९७.९५ टक्के लागला.

विज्ञान विभागांमध्ये एकूण ६७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.६७ विद्यार्थीही उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा विज्ञान विभागाचा निकाल शंभर टक्के लागला.प्रथम क्रमांक कुमारी मेस्त्री गायत्री संदीप हिला ६०० पैकी ५४१ गुण ९०.१७ टक्के मिळाले. द्वितीय क्रमांक कुमारी चव्हाण पलक शंकर ६०० पैकी ४८३गुण ८0.५०टक्के, तृतीय क्रमांक कुमार तळावडेकर विनीत प्रशांत ६००पैकी ४७१गुण ,७८.५०टक्के मिळाले.

वाणिज्य विभागातून १४७ विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी १४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यालयाचा वाणिज्य विभागाचा एकूण निकाल ९८.६३ टक्के. प्रथम क्रमांक कुमारी सावंत निकिता सुरेश ६००पैकी५३० गुण ८८.३३ टक्के,द्वितीय क्रमांक कोरगां वकर सुशांती अर्जुन ६०० पैकी ४९७ गुण ८२.८३ टक्के, तृतीय क्रमांक कुमार तेंडोलकर चैतन्य चारुदत्त ६०० पैकी ४८४ गुण ८०.६७ टक्के गुण मिळाले .

कला विभागाचा एकूण निकाल ९०.३२टक्के,कला विभागातून एकूण ३१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते, त्यापैकी २८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम क्रमांक कुमार उसपकर साहिल संजय ६०० पैकी ५२५गुण ७८.८३टक्के ,द्वितीय क्रमांक कुमारी पाटकर स्नेहा समाधान ६००पैकी ४०२गुण ६७ टक्के ,तृतीय क्रमांक कुमार सातार्डेकर यश दिनेश ६०० पैकी ३५६ गुण ५९.३३ टक्के मिळाले.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्था अध्यक्ष डॉ.श्री. विलासराव देसाई,उपाध्यक्ष श्री. दिगंबर सामंत, कार्याध्यक्ष श्री. समाधान परब,माजी कार्याध्यक्ष श्री. रेडकर गुरुजी तसेच सर्व कार्यकारणी सदस्य,मुख्याध्यापक श्री. शामराव पांडुरंग कोरे, पर्यवेक्षक श्री. राजन सोमाजी हंजनकर ,सर्व शिक्षक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी केले. सर्वांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि निकालाबद्दल समाधान व्यक्त केले.

अभिप्राय द्या..