रत्नागिरी /-

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे क्षेत्र व्यवस्थापक श्री.हरिश्चंद्र वेंगुर्लेकर हे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील औद्योगिक क्षेत्रातील कार्यरत होते.त्यांच्या सेवानिवृत्तच्या विशेष ! दिवशी औद्योगिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आणि अधिकारी वर्गाने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रम स्थळी प्रत्यक्ष भेटून पुढील वाटचालीस वेंगुर्लेकर यांना शुभेच्छा दिल्या.हा कार्यक्रम रत्नागिरी आणि सिंधुुदुर्ग अशा दोन जिल्ह्यात संपन्न झाला.यावेळी त्यांच्या मित्र परिवार आणि अधिकारी वर्ग ,सामाजिक कार्यकर्ते ,एमआयडीसी क्षेत्रातील मोठ-मोठे व्यवसायिक यांनी उपस्थित राहून श्री वेंगुर्लेकर यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रादेशिक आधिकरी प्रशांत पाडाळकर यांनी वेंगुर्लेकर यांचा जाहीर सत्कार केला.यावेळी प्रशासकीय आधीकरी प्रशांत पाडाळकर ,उद्योजक बांदिवडेकर व ईतर अधिकारी उपस्थित होते.कुडाळ औद्योगिक संघटनेकडून सेवा निवृत्तीच्या वेळी सत्कार करण्यात आला.यावेळी माजी केंद्रीय मंत्री श्री सुरेश प्रभू ,माजी रेल्वेमंत्री , मा. बी.एन.पाटील, जिल्हाधिकारी रत्नागिरी, राजू सावंत यांच्या समवेत यांनी देखील उपस्थित राहून श्री. वेंगुर्लेकर यांना शुभेच्छा दिल्या.या सेवानिवृत्त कार्यक्रमाच्या दरम्यान श्री. हरिश्चंद्र वेंगुर्लेकर यांनी सांगितले की ,मी आज रोजी विहित माझ्या वयोमानानुसार महाराषट्र शासनाच्या महामंडळाच्या सेवेतून चांगले सेवभावी काम करून मी सेवानिवृत्त झालो याचा मला आभिमन आहे असे
क्षेत्र व्यवस्थापक , एम.आय.डी .सी रत्नागिरी येथील आधिकारी श्री.हरिश्चंद्र वेंगुर्लेकर यांनी कार्यक्रम स्थळी आपल्या भाषणात उद्गार काढले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page