You are currently viewing कणकवली शहरातील युवकाची गळफास लावून घेत, केली आत्महत्या वर्षभरापूर्वीच झाले होते लग्न आत्महत्येचे कारण अस्पष्ट.

कणकवली शहरातील युवकाची गळफास लावून घेत, केली आत्महत्या वर्षभरापूर्वीच झाले होते लग्न आत्महत्येचे कारण अस्पष्ट.

कणकवली /-

कणकवली शहरातील गौरव प्रकाश सरुडकर (28 ) या युवकाने हर्णे आळी येथील सापळे सव्हिसिंग सेंटरच्या बाजूला असलेल्या इमारतीच्या शिगेला नायलॉन च्या दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. घटनास्थळी गौरवच्या डाव्या पायात स्लीपर होती, तर उजव्या पायातील स्लीपर बाजूला पडली होती. हा प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला. गौरवच्या आत्महत्या मागील नेमके कारण समजू शकले नाही. गौरवचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. त्याच्या पश्चात पत्नी, आई, भाऊ, चुलते, चुलती असा परिवार आहे.

अभिप्राय द्या..