You are currently viewing पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी स्वीकारला वेंगुर्ले पोलीस ठाण्याचा कार्यभार…

पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी स्वीकारला वेंगुर्ले पोलीस ठाण्याचा कार्यभार…

वेंगुर्ला /-

येथील पोलीस ठाण्यातील निरीक्षक पदाचा कार्यभार अतुल जाधव यांनी आज स्वीकारला. यावेळी त्यांचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह वेंगुर्ले वासीयांकडून स्वागत करण्यात आले. दरम्यान वेंगुर्लेत सुरू असलेल्या अमली पदार्थांवर आळा घालण्यासाठी “अॅक्शन प्लान” बनविण्यात येणार आहे, असे श्री जाधव यांनी यावेळी सांगितले. “आम्ही वेंगुर्लेकर” शिष्टमंडळाने आज त्यांची भेट घेतली..

वेंगुर्ले पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक तानाजी मोरे हे ३१ मे रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या या पदावर वैभववाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या श्री. जाधव यांची जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात बदली केली. त्यानुसार श्री. जाधव यांनी वेंगुर्ले पोलीस ठाण्याचा आज चार्ज स्वीकारला. यावेळी अधिकारी व कर्मचारी यांनी त्याचे स्वागत केले.

“आम्ही वेंगुर्लेकर” शिष्टमंडळाने आज नूतन पोलीस निरीक्षक जाधव यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी झालेल्या चर्चमध्ये वेंगुर्लेत सुरु असलेल्या अमली पदार्थावर आळा घालण्या बाबत चर्चा झाली. त्यावर आळा घालण्यासाठी अॅक्शन न बनवतो व कारवाई करतो असे आश्वासन पोलीस निरीक्षक श्री जाधव यांनी दिले.

अभिप्राय द्या..