सिंधुदुर्ग /-
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या जन्मस्थलाच्या दर्शनाला जाण्यापासून रोखण्यासाठी शासकीय पोलीस यंत्रणा वापरण्यात आली. आमदार पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना त्यांच्या कार्यकर्त्यांसह पोलिसांनी ताब्यात घेतले. ज्यांच्या राजकीय इस्टेब्लिशमेंटसाठी ही स्टंटबाजी सरकारने केली ते रोहित पवार कोण आहेत? ब्याऐशी वर्षात शरद पवार कधी माथा टेकायला इथे आले होते का? आदी प्रश्नांची सरबत्ती करत कार्यकर्त्यांनी पवार कुटुंबीयांवर टीकेचा भडिमार केला होता. पवारांच्या शोबाजीसाठी भक्तांना दर्शनाला जाण्यापासून रोखणाऱ्या महाआघाडी सरकारच्या नावाने शिमगा करण्यात आला होता.
तोच धागा पकडत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री प्रमोद जठार यांनी झणझणीत ट्विट करत थेट अजित पवारांना उत्तर दिले आहे. ये मर्दो का काम है… मुर्दे क्या खाक समजेंगे म्हणत त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.आपल्या ट्विटमध्ये प्रमोद जठार यांनी म्हंटले आहे की मोंगलानी पाडलेल्या व त्याच्या मशीदी केलेल्या सगळ्या देवळांचा अगदी काशीच्या विश्वनाथ मंदिरासह जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला. इतिहास वाचावा मगच माला अर्पण करावी. ये मर्दो का काम है… मुर्दे क्या खाक समजेंग?समझने वालोंको इशारा काफी अशा भाषेतल्या या ट्विटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
