You are currently viewing सहकार भारतीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सदस्य नोंदणी अभियानाची सुरवात..

सहकार भारतीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सदस्य नोंदणी अभियानाची सुरवात..

सिंधुदुर्ग /-

सहकार भारती सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सदस्य नोंदणी अभियानाची सुरवात करण्यात आली.या नोंदणी अभियानाची सुरवात दि.३० मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रधान कार्यालय येथे आमदार नितेश राणे यांना सदस्य करुन करण्यात आली. सदस्य नोंदणीचा शुभारंभ जिल्हा बँक चे अध्यक्ष मनिष दळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केला या कार्यक्रमास बँकेचे सर्व संचालक सहकार भारती चे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय यादव तसेच कोकण विभागचे अध्यक्ष शैलेश दरगुडे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष अमित आवटे,संघटन सरचिटणीस राजेश साळगावकर आणि जिल्ह्यातील सहकार भारती चे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर व सर्व संचालकांना सदस्य करून अभियानाला सुरुवात झाली तसेच बँकेच्या संचालक मंडळा सोबत सहकार भारतीं च्या सदस्यानची बैठक झाली.बैठकीत सहकार भारतीच्या अखिल भारतीय कामचे स्वरूप सर्व मान्यवर संचालकांना सांगण्यात आले.अध्यक्ष मनिष दळवी उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी सहकारातील सर्व कार्यकर्त्यांना सहकार भारती चे सदस्य होण्याकरिता आव्हान केले अध्यक्ष  मनिष दळवी ह्यांनी सर्व संचालकांतर्फे सहकार भारतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.तसेच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी सहकार भारतीच्या सोबत काम करत राहण्याची ग्वाही दिली.

अभिप्राय द्या..