You are currently viewing कुडाळमधील दारू घोटाळा संदर्भात महाराष्ट्रराज्य मराठी पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हा पोलिस आधिक्षकांची भेट..

कुडाळमधील दारू घोटाळा संदर्भात महाराष्ट्रराज्य मराठी पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली जिल्हा पोलिस आधिक्षकांची भेट..

सिंधुदुर्ग /-

बहुचर्चित असलेल्या कुडाळ शहरातील दारू घोटाळा आणि जिल्ह्यातील राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना सिंधुदुर्ग च्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली.

जिल्ह्यात कुडाळ शहरात नुकत्याच झालेल्या बेवारस दारु घोटाळ्याप्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांची भेट घेऊन दोषीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी जिल्हाध्यक्ष कृष्णा उर्फ आबा खवणेकर, जिल्हा उपाध्यक्ष समिल जळवी, जिल्हा सदस्य मिलिंद धुरी, गुरुनाथ राऊळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यासंदर्भात डीवायएसपी श्री. कांबळे यांच्याकडे सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्याकडून रीतसर माहिती प्राप्त झाल्यानंतर कुडाळ पोलिस ठाण्याच्या दोन्ही अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. दरम्यान कुडाळ, वेंगुर्ले सह जिल्ह्यातील इतर अवैध धंद्यांविरोधात तात्काळ कारवाईचे सत्र सुरू करण्यात येईल, आज सायंकाळनंतर जिल्ह्यातील चित्र वेगळेच असेल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे यांनी सांगितले.

यापूर्वी कुडाळ पोलिस ठाणे अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराबाबत सर्वपक्षीय व सामाजिक संघटनांनी कायदेशीर कारवाईची मागणी केली होती. यावर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. दाभाडे यांनी तात्काळ कारवाई करण्याचा निर्णय घेतला तर तो सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा ठरेल आणि प्रत्येक जण त्या निर्णयाचे स्वागतच करेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा