कुडाळ /-


 
कुडाळ – काळानुसार समजून घेऊन साधना केली तर जीवन यशस्वी होईल.आज हिंदू धर्मांतरीत होत असून साधनेचे पाठबळ नसल्याने हिंदू धर्मांतरीत होत आहेत. आताचा काळ लयाकडे चालला आहे. आता युग परिवर्तन होऊन हिंदु राष्ट्र स्थापन होणार आहे, असे प्रतिपादन सनातनच्या सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित दि. २३ आणि २४ एप्रिल या २ दिवशीय   हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळेत त्या बोलत होत्या.  प.पू. राऊळ महाराज मठाच्या सभागृहात ही कार्यशाळा संपन्न झाली.
कार्यशाळेच्या सुरुवातीला सनातनचे सद्गुरु (सुश्री) स्वाती खाडये, सद्गुरु सत्यवान कदम आणि हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, गोवा कोकण समन्वयक  मनोजकुमार खाडये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
यावेळी सद्गुरु स्वाती खाडये पुढे म्हणाल्या, सुख-दुखा:च्या पलीकडे आनंद आहे. मनुष्याचा जन्म प्रारब्धानुसार होत असतो आणि प्रारब्धावर मात करून साधना केली तर ईश्वर प्राप्ती होते. मनुष्य जन्मात आपण साधना करु शकतो.
हिंदु साधना समजून घेऊन ती करत नाही. अस न केल्याने आज हिंदू धर्मांतरीत होत आहेत. साधनेमुळे जीवनात अमुलाग्र बदल होतो. हे सनातनच्या ११९ संतांनी आपल्या जीवन प्रवाहातून दाखवून दिले आहे. विज्ञान व अध्यात्मानेही हे सिद्ध केले आहे कि आपल्या मनात दिवसाला ८० हजार विचार येतात. अस्थिर मनाला स्थिर करायचे असले तर नामजप करणे आवश्यक आहे. घरातील सर्वांनी एकत्रित बसून नामजप केला तर घर ही सात्वीक होते. कलियुगात नामजपाला  महत्व आहे.
यावेळी श्री. मनोज खाड्ये यांनी सांगितले की,भारत आज स्वतंत्र झाला असला तरी आजही भारतात ब्रिटिशकालीन कायदे कार्यरत आहेत. आपण १८६० मधील कायदे वापरत असू तर आपण स्वातंत्र्यात आहोत की पारतंत्र्यात याचा विचार आपण करायला हवा. ब्रिटीश आजही त्यांच्या कायद्याच्या माध्यमातून आपल्यावर अधिराज्य गाजवत आहेत. या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी विविध विषयांवर वक्त्यांची उद्बोधक अशी मार्गदर्शने झाली. यामध्ये गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धर्मप्रेमींनी आपली मनोगते व्यक्त केली. हिंदू जनजागृती समितीचे हिंदूना प्रेरणादायी कार्य या दोन दिवसाच्या कार्यशाळेच्या माध्यमातून आपल्याला अगदी जवळून पाहता आले. या कार्यशाळेने आम्हाला सात्विकता, संस्कार, ईश्वरभक्ती शिकवली. आपल्या धर्मावरील विविध आघातांची माहिती दिली. धर्माभिमान व धर्माकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी अन् हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रेरणा दिली. ही कार्यशाळा म्हणजे एकप्रकारचे हिंदुत्वाचे धगधगते अग्निकुंड असून आमच्या मनात प्रज्वलित झालेल्या हिंदुत्वाच्या मशालीने आम्ही आपापल्या भागातील हिंदूंच्या मनात हिंदूत्वाच्या मशाली प्रज्वलित करू, असे सांगितले. या कार्यशाळेचा समारोप संपुर्ण वंदे मातरम् गिताने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.कृपाली भुवड व वैष्णवी मिसाळ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page