You are currently viewing तिलारी धरणग्रस्त याच्या मागण्यांबाबत पालकमंत्र,आमदार यांनी आश्र्वासन देऊनही कार्यवाही नाही कुडासे खुर्द ग्रा.प.सदस्य याचे १ मे रोजी उपोषण.

तिलारी धरणग्रस्त याच्या मागण्यांबाबत पालकमंत्र,आमदार यांनी आश्र्वासन देऊनही कार्यवाही नाही कुडासे खुर्द ग्रा.प.सदस्य याचे १ मे रोजी उपोषण.

दोडामार्ग /-

तिलारी धरणग्रस्त पुनवर्सन गावठाण नागरी सुविधा बाबत वारंवार उपोषण आंदोलन करून लेखीआश्वासने देऊनही अधिकारी कार्यवाही करत नाही यांची दखल घ्यावी यासाठी पाल पुनवर्सन गावठाण मुख्य रस्त्यावर भर पाऊसात १५ आगस्ट २०२१ रोजी कुडासे खुर्द सरपंचा संगिता देसाई सदस्य संदेश देसाई सदस्या सानवी दळवी मयुरी पालव यासह ग्रामस्थ उपोषणाला बसले होते त्यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी लेखी पत्र देउन उपोषण मागे घेण्याची विनंती केली मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही नाही की बैठक त्यामुळें त्याच्या निषेधार्थ ग्रा . प. सदस्य उमेश महादेव नाईक व सदस्या सौ संजना सावंत यांनी १ मे रोजी पोहच मुख्य रस्त्यावर उपोषणाला बसणार आहे याबाबतची निवेदने संबधिताना दिली आहे

यापूर्वी दिलेल्या निवेदनात त्यांनी पुढीलप्रमाणे मागणी केली आहे
१) मुख्य मागणी आबेली पाल पुनवर्सन पोहच रस्ता भूसंपादन रस्ता स्मशानभूमी पोहच रस्ता भूसंपादन व्हावा
२) कुडासे खुर्द पूनवसानात भूखंड देण्यात आले ते मोजून देण्यात यावे ताबे पावती व सात बारा जमीन वेगळी तसेच हद्दीतील दगड जागेवर नाही ते सर्वे करून मिळावे नव्याने मागणीप्रमाणे भूखंड देण्यात यावे ०३)मौजे आबेली येथील प्रलंबित जलसंपदा विभागाकडून भूसंपादन प्रक्रिया तातडीने होऊन सात बारा अलग करून मिळावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत याबाबतीत पालकमंत्री यांनी बाबुराव धुरी यांच्या मार्फत उपोषण स्थळी संपर्क करून सरपंच व सदस्य यांच्याशी चर्चा केली व तिलारी पुनवर्सन प्रश्नाबाबत तातडीने जिल्हाधिकारी ,भूसंपादन अधिकारी, कार्यकारी अभियंता ,तिलारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
यावेळी दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर यांनी भेट देत चर्चा केली त्यानी आपण जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे असे सांगितले त्यानंतर सिंधुदुर्ग जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांच्यासह आमदार दीपक केसरकर जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर समाज कल्याण सभापती अंकुश जाधव बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण महिला बाल कल्याण सभापती शर्वणी गावकर दोडामार्ग पंचायत समिती सभापती संजना कोरगावकर उपसभापती सुनंदा धरणे तहसीलदार अरुण खानोलकर जिल्हा नियोजन मंडळ सदस्य तथा पंचयात समिती सदस्य बाबुराव धूरी सेना संघटक संजय गवस भिवा गवस लक्ष्मण आयनोडकर झरेबाबर सरपंच स्नेहा गवस आदी उपोषणाला भेट देत पाठींबा दिला होता यावेळी माजीपालकमंत्री आमदार केसरकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले यापूर्वी त्यानी पालकमंत्री असताना दिलेले आश्वासन अधिकारी पूर्ण करत नसल्याने तिलारी धरणग्रस्त यांनी नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर
जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी आपण पुनवर्सन गावठाण विकास कामे करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तर मुख्य रस्तासाठी आवश्यक निधी जिल्हा परिषद सेस फडातून देण्याचे आश्वासन दिले होते तर अन्य पुनवसनातील प्रश्नाबाबत पाठ पुरावा करण्याचे आश्वासन सरपंच व ग्रामस्थांना दिले होते यावेळी सर्व जिल्हा परिषद सभापती उपस्थित होते यावेळी मोठ्या सख्यने ग्रामस्थ उपस्थित होते
मात्र अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नसल्याने ग्रां प सदस्य उमेश नाईक व संजना सावंत यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे यामध्ये त्यांनी आंबेली स्वेच्छा पुनर्वसन पाल वाडी येथील रस्ते मुख्य मागणी असून ते डाबरीकरण करणे ग्रा प नोद व्हावी विद्युत पोल घरावरून गेली आहे ती बदलून मिळावी आदीसह रस्त्यासाठी निधी देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत

अभिप्राय द्या..