You are currently viewing वेंगुर्ले येथील वैद्यकीय शिबिरात १७० जणांची आरोग्य तपासणी –

वेंगुर्ले येथील वैद्यकीय शिबिरात १७० जणांची आरोग्य तपासणी –

      वेंगुर्ला / –

वेंगुर्ले तालुका पर्यटनदृष्ट्या विकसित होत आहे.वेंगुर्ले येथे अद्ययावत सुसज्ज असे उपजिल्हा रुग्णालय झालेले असून पर्यटनाबरोबरच येथे परिपूर्ण वैद्यकीय सुविधा देण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहे. वैश्य समाजाच्या वतीने सर्व समाजासाठी वैद्यकीय शिबिराचे केलेले आयोजन हा चांगला पायंडा आहे,असे प्रतिपादन आमदार दिपक केसरकर यांनी वेंगुर्ले येथे केले.बी. एन.वालावलकर डेरवण हॉस्पिटल मेडिकल कॉलेज, सिव्हिल हॉस्पिटल सिंधुदुर्ग व वैश्य समाज वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय येथे मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ.केसरकर बोलत होते.या शिबिराचे उद्घाटन आ. दिपक केसरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी वैश्य समाजाचे अध्यक्ष सुनिल डुबळे, कार्यवाह कपिल पोकळे, सुहास गवंडळकर, गणेश अंधारी, अमृत काणेकर, सुरेश भिसे, पंकज शिरसाट, राकेश सापळे, आर्यन डुबळे, राज पोकळे वृंदा गवंळकर, प्रणाली अंधारी, चेतन अंधारी, शेखर काणेकर, मच्छीमार नेते वसंत तांडेल,डेरवण हॉस्पिटल चे थोरात, वैद्यकीय अधिक्षक डॉ.पी.डी. वजराटकर, वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. गृहिता राव, डॉ.पवार, अस्थिरोग तज्ञ डॉ रोहन नागरे, जनरल सर्जन डॉ. स्वप्निल निकम, स्त्री रोग तज्ञ विश्वंभर देवकर, बालरोगतज्ञ डॉ. प्रचेता गुप्ता, जनरल फिजिशियन डॉ.लोचन मालंडकर, नेत्ररोग तज्ञ डॉ. पल्लव मकानी,डॉ. मल्हार मुरंजन आदी उपस्थित होते.यावेळी आ.केसरकर यांचा सुनिल डुबळे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच आ.केसरकर यांच्या हस्ते कोरोना कालावधीत व आता चांगले काम करीत असल्याबद्दल उपस्थित डॉकटर व सर्व स्टाफ यांचा सन्मान करण्यात आला.
या शिबिरात एकूण १७० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.या शिबिरास शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शिवसेना शहरप्रमुख अजित राऊळ यांनी भेट दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा