नारळ हा कल्पवृक्ष आहे.सिंधुदुर्ग जिल्हयात नारळ लागवडीला भरपूर वाव आहे.त्यामुळे केरळ प्रमाणे येथे आर्थिक सुबत्ता आणावयाची असेल तर नारळ लागवडीकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे,असे प्रतिपादन एम.के.गावडे यांनी केले.वेंगुर्ला येथील महिला काथ्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेत दरवर्षीप्रमाणे जागतिक नारळ दिन साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे सल्लागार एम. के. गावडे हे बोलत होते. या जागतिक नारळ दिन कार्यक्रमाचे उद्घाटन वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष के.जी. गावडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आले.यावेळी संस्थेच्या सचिव प्रज्ञा परब, नारळ मित्र नारायण भिकाजी उर्फ रमण खानोलकर, सुजाता देसाई, स्वप्नील परब, नितेश मयेकर, नंदगडकर,प्रदीप सावंत आदी उपस्थित हाते.संस्थेतर्फे दरवर्षी २ सप्टेंबरला नारळ दिन साजरा केला जातो. यावेळी निवडक शेतकरी व नारळ मित्र यांचा सत्कार करण्यात येतो.कोकणच्या आर्थीक उन्नतीसाठी व्यावसायिक दृष्टीने नारळ लागवड व्हावी यासाठी शेतक-याना प्रेरणा मिळावी हा यामागील उद्देश असल्याचे संस्थेच्या सचिव प्रज्ञा परब यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात स्पष्ट केले.नारळ हा कल्पवृक्ष आहे.
एक नारळाचे झाड एका माणसाला संपुर्ण वर्षभर पोसू शकते.नारळाचा कोणताच भाग वाया जात नाही.झावळ, सोडणे,खोड,करवंटी सर्वच भाग हे पैसा मिळवून देणारे आहेत.तरीहि आपल्याकडे नारळ लागवडीकडे म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. आंबा,काजू,लागवडी प्रमाणेच येथे नारळ लागवड मोठया प्रमाणात होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन के. जी. गावडे यांनी करुन संस्था दरवर्षी जागतिक नारळ दिनाच्या निमित्ताने नारळ उत्पादक शेतकरी व नारळ मित्र यांना नारळ लागवडीसाठी प्रेरणा मिळावी, यासाठी करीत असलेले प्रयत्न खरोखरच कौतुस्कास्पद असल्याचे सांगितले.यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात नारळ उत्पादक शेतकरी तसेच नारळ मित्र रमण खानोलकर,स्वप्नील परब यांचा शाल,श्रीफळ व नारळाचे झाड देवून सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे माजी मुख्यमंत्री भारतरत्न प्रणव मुखर्जी, तसेच एम. के. गावडे यांच्या मातोश्री सत्यवती गावडे यांच्या निधनानिमित्त श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक व आभार प्रज्ञा परब यांनी मानले.