मातोंड वेंगुर्ला तालुक्यातील मातोंड वरचेबांबर शाळेचे कबबुलबुल पथकातील विद्यार्थी संतोषी फटू सावंत (हिरकपंख बुलबुल),गणेश उदय परब व कृष्णा आनंद कोरगावकर (चतुर्थचरण कब) हे राज्यस्तरीय कबबुलबुल परिक्षेत यशस्वी झाले असून ही परिक्षा महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड, मुंबई यांच्यावतीने जिल्हा प्रशिक्षण केंद्र सडामिऱ्या, रत्नागिरी येथे घेण्यात आली होती.सदर यशस्वी विद्यार्थी राष्ट्रीयस्तरीय सुवर्णबाण कबबुलबुल परिक्षेस पात्र ठरली आहेत.त्यांना शाळेचे मुख्याध्यापक पवन अहिरे,कबमास्टर सुभाष साबळे आणि फ्लॉकलीडर वैशाली साबळे यांचे मार्गदर्शन लाभले.या यशस्वी विद्यार्थ्यांचे सिंधुदुर्ग भारत स्काऊट गाईड जिल्हा संस्थेच्यावतीने सरचिटणीस स्नेहलता राणे,जिल्हा संघटक अंजली माहुरे व इतर कर्मचारी तसेच विस्तार अधिकारी शोभराज शेर्लेकर केंद्रप्रमुख लवू चव्हाण शाळा व्यवस्थापन समिती,पालक, ग्रामस्थ, जिल्ह्यातून अनेक शिक्षक आदींनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.