You are currently viewing रेडी येथील आरोग्य तपासणी शिबिरात ३६५ जणांची आरोग्य तपासणी.

रेडी येथील आरोग्य तपासणी शिबिरात ३६५ जणांची आरोग्य तपासणी.

वेंगुर्ला / –


रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरोग्य विभाग व रुग्ण कल्याण समिती रेडी व प्रितेश राऊळ मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ३६५ जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.या शिबिराचे उदघाटन जि.प.अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.यावेळी जि.प.सदस्य प्रितेश राऊळ, जि. प.सदस्य विष्णुदास उर्फ दादा कुबल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.महेश खलिपे, माजी पं. स.सदस्य मंगेश कामत, रेडी सरपंच रामसिंग राणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, आरवली सरपंच तातोबा कुडव, मोचेमाड सरपंचा स्वप्नेशा पालव, रेडी पीएचसी च्या वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहा नवार, डॉ.रश्मी शुक्ल,डॉ.प्रसाद प्रभूसाळगावकर, फोमेंतो रेडी पोर्ट कंपनीचे अधिकारी, तालुका आरोग्य विस्तार अधिकारी गोसावी,परब, रेडी उपसरपंच नामदेव राणे, शिरोडा उपसरपंच राहुल गावडे आदींसह रेडी पीएचसी स्टाफ उपस्थित होते.
यावेळी संजना सावंत यांचा शाल,श्रीफळ व रेडी श्री गणपतीची प्रतिमा देऊन प्रितेश राऊळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.महेश खलिपे व दादा कुबल यांचाही सन्मान करण्यात आला.तसेच कोरोना कालावधीत रेडी पीएचसी ला वारंवार रुग्णसेवेसाठी साहित्य, मदत करणाऱ्या फोमेंतो रेडी पोर्ट अधिकारी यांचाही शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.तसेच आदर्श जबाबदार नागरिक व अन्य मान्यवर यांनाही सन्मानित करण्यात आले.या शिबिरास कॅन्सरतज्ञ डॉ.आदेश पालयेकर, स्त्रीरोगतज्ञ डॉ.गायत्री शर्मा पालयेकर, अस्थिरोगतज्ञ डॉ.दत्तात्रय ठाकूर, फिजिशियन डॉ.गौरव घुर्ये, दंत चिकित्सक डॉ.किशोर धोंड, फिजिओथेरपिस्ट डॉ.चैताली प्रभू, आयुर्वेदिक तज्ञ डॉ.सई लिंगवत, डॉ.अभिजित वनकुद्रे, त्वचारोगतज्ञ डॉ.किरण नाबर, विवेकानंद नेत्रालय नेत्रचिकित्सक टीम आदी सहभागी झाले होते.यावेळी स्पेशालिस्ट डॉक्टरांमार्फत ईसीजी, रक्त तपासण्या,कॅन्सर तपासणी व विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.यावेळी प्रितेश राऊळ मित्रमंडळातर्फे माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रेडी पीएचसी ला वाटर प्युरिफायर देण्यात आला.माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांच्या प्रयत्नातून तसेच रेडी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने या आरोग्य शिबिरास चांगला प्रतिसाद लाभला.

अभिप्राय द्या..