You are currently viewing थरार कब्बडीचे औचित्य वाढदिवसाचे.;युवा कार्यकर्ते विशाल परब मित्रमंडळ आणि कुडाळ तालुका भाजप यांचे आयोजन..

थरार कब्बडीचे औचित्य वाढदिवसाचे.;युवा कार्यकर्ते विशाल परब मित्रमंडळ आणि कुडाळ तालुका भाजप यांचे आयोजन..

कुडाळ /-

माजी खासदार तथा महाराष्ट्र प्रदेश भाजप सचिव डाँ निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे कब्बडी खेळाचा महासंग्राम होणार असून जिल्ह्यातील नामांकित संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.माजी खासदार निलेश राणे तसेच राणे कुटुंबियांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असलेले युवा कार्यकर्ते विशाल परब यांचे मित्रमंडळ आणि कुडाळ तालुका भाजप यांच्या वतीने माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त या कब्बडी महासंग्रामाचे आयोजन कुडाळ हायवे डेपो येथे करण्यात आले आहे.जिल्ह्यात होणार्‍या या कब्बडीच्या महासंग्रामाला प्रेक्षकांची मोठी गर्दी होणार असून त्या बाबतचे नियोजन युद्ध पातळीवर सुरू आहे.आज सायंकाळी ६ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन निलेश राणे यांच्या हस्ते होणार असून त्यासाठी विशाल परब मित्रमंडळ सज्ज झाले आहे.

अभिप्राय द्या..