You are currently viewing जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या १६ वा वर्धापनदिन दोडामार्ग -सावंतवाडी तालुक्यात सामाजिक उपक्रमांनी झाला साजरा.

जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेच्या १६ वा वर्धापनदिन दोडामार्ग -सावंतवाडी तालुक्यात सामाजिक उपक्रमांनी झाला साजरा.

सावंतवाडी / –

करोना काळात रुग्ण संख्येत प्रचंड वाढ झाली होती. या काळात सरकारी रुग्णालयात बेडशीट ची मागणीही वाढली होती. आता परिस्थिती नियंत्रणात असली तरी आता नियमित अॅडमिट पेशंट ना याची कमतरता भासत होती. याच मागणीचा विचार करुन .महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. मयुरेश पटवर्धन व आरोग्य सेविका यांच्याकडे रुग्णांसाठी बेडशीट दिल्या. विलवडे उपकेंद्र येथे मनसेचे शाखाध्यक्ष श्रीराम सावंत यांच्या हस्ते आरोग्य सेविका श्रीम. केसरकर आरोग्यसेवक श्री. चव्हाण यांच्याकडेही बेडशीट देण्यात आल्या.. त्याचप्रमाणे शेरले उपकेंद्राच्या आरोग्यसेविका श्रीम. रश्मि शेणई यांच्याकडे मनसेच्या महिला शाखाध्यक्ष सौ. स्नेहा मेस्त्री यांनी बेडशीट चे वाटप केले… त्याचप्रमाणे दोडामार्ग तालुक्यामध्ये दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय चे वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांच्याकडे दोडामार्ग तालुकाअध्यक्ष सुनील गवस, माजी शहराध्यक्ष अभिजीत खाबंल, मोतीराम वरक, मधुसूदन खाबलं यांनी बेडशीट सुपूर्द केल्या … मोरगाव आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मेघा अंधारी, आरोग्य सेविका गायत्री परब यांच्याकडे बेडशीट देण्यात आल्या.. दोन्ही तालुक्यांमध्ये सामाजिक बांधिलकी जपत बेडशीट देण्यात आल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या स्तुत्य उपक्रमाचे वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेविका यांनी कौतुक केले व अशाच सामाजिक व रुग्णांच्या सेवेसाठी आपण सहकार्य कराल अशी आम्ही अपेक्षा करतो व आपल्या पक्षाच्या सोळाव्या वर्धापन दिनाला आमच्या शुभेच्छा यावेळी मनसेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष धीरज परब, सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, दोडामार्ग तालुका अध्यक्ष सुनील गवस, बांदा माजी विभागीय अध्यक्ष मिलिंद सावंत, निरवडे शाखाध्यक्ष प्रशांत निरवडेकर, विलवडे शाखाध्यक्ष श्रीराम सावंत, शेरले महिला शाखाध्यक्ष स्नेहा मेस्त्री, विष्णू वस्कर, दोडामार्ग माजी शहर अध्यक्ष अभिजित खांबल, मोतीराम वरक, मधुसूदन खांबल आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा