मुंबई /-

एसटी कर्मचाऱ्यांचा विलिनीकरणच्या मागणीसाठी सुरू असलेला संप उद्या मिटण्याची शक्यता आहे. या संदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक घेण्यात आली आहे. यावेळी सकारात्मक चर्चा झाली असून चार महिन्यांपासून सुरु असलेला एसटी संप आता मिटण्याची शक्यता आहे.दरम्यान उद्या सकाळी १० वाजता विधानपरिषद सभापती बैठकीतून निघालेल्या तोडग्याबाबत सभागृहात माहिती देणार आहे.

विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या निर्देशानुसार एसटी संपाबाबत आमदारांची समिती स्थापन करण्यात आली आहे. समिती स्थापन करुन आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करण्याच्या सूचना काल सभापतींनी दिल्या होत्या. त्यानुसार आमदारांची समिती स्थापन करण्यात आलीय. आज १० मार्चच्या अल्टिमेटम अगोदर एसटी संदर्भात महत्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, शेकापचे जयंत पाटील, प्रविण दरेकर शेखर चन्ने बैठकीला उपस्थित होते.

एसटी कर्मचाऱ्यांचे विलिनीकरणाच्या मागणीसाठी अजूनही आंदोलन सुरू आहे. मात्र, यासाठी स्थापन करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर केला. तोच अहवाल विधानसभेत पटलावर ठेवण्यात आला. एसटी कर्मचाऱ्यांचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण शक्य नाही, असं अहवालात म्हटलंय. पगारवाढीचा निर्णय घेतल्यानंतरही विलिनीकरणाची मागणी लावून धरत एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु ठेवलं आहे. २८ ऑक्टोबरला एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाला होता. राज्याची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटीची वाहतूक गेल्या १०० दिवसांहून अधिक काळासाठी बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. या संपामुळे एसटी महामंडळाचे तब्बल १६०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. एसटीच्या ८२ हजार ४९८ कर्मचाऱ्यांपैकी ५४ हजार ३९६ कर्मचारी अजूनही संपत सहभागी आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या आजवर सर्वाधिक काळ चाललेलला हा संप आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page