कणकवली /
हळवल मार्गावरील रेल्वे फाटक लगत आज अज्ञात व्यक्तीला रेल्वेची धडक बसली. यात ती व्यक्ती जागीच ठार झाली आहे. सायंकाळी साडे पाच च्या सुमारास हा प्रकार लक्षात आला. मृत व्यक्तीच्या कुटुंबियांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. मडगाव ते मुंबई मडगाव ते मुंबई जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसच्या धडकेत अज्ञात व्यक्तीच्या डोक्यावरून रेल्वेचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृताच्या अंगावर पांढरा शर्ट आणि काळी पँट आहे. तर पायात सँडल आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे कर्मचारी तसेच कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.