You are currently viewing कुडाळ येथे महिला महोत्सवाचे उद्घाटन झाले सहाय्यक जिल्हाधिकारी संचिता मोहपात्रा यांच्या हस्ते झाले उद्घाटन..

कुडाळ येथे महिला महोत्सवाचे उद्घाटन झाले सहाय्यक जिल्हाधिकारी संचिता मोहपात्रा यांच्या हस्ते झाले उद्घाटन..

कुडाळ /-

आई अंबे….. जगदंबे….. मला अभय दे….. मला विजय दे….. लढाया बळ दे….. असा जागर घातला तो कुडाळ शहरांमध्ये आयोजित केलेल्या भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या महोत्सवात. यामध्ये मोठ्या संख्येने महिला उपस्थित झाल्या होत्या तसेच महिलांचे कलागुण विविध स्पर्धा याठिकाणी संपन्न झाल्या.
भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्यावतीने कुडाळ शहरातील भाजप कार्यालय येथे महिला दिनाचे औचित्य साधून महिला महोत्सव आयोजित केला होता या मेळाव्याचे उद्घाटन सहाय्यक जिल्हाधिकारी संचिता मोहपात्रा, यांच्या हस्ते झाले यावेळी सभापती नूतन आईर, माजी नगरसेविका उषा आठले, पंचायत समिती सदस्य सुप्रिया वालावलकर, सौ प्रभू, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष आरती पाटील, शहर महिला अध्यक्ष ममता धुरी, माजी जि. प. सभापती अस्मिता बांदेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुमेधा पाताडे, दीपलक्ष्मी पडते, सौ. माने, सौ. बेलवलकर, माजी नगरसेविका अश्विनी गावडे, प्रज्ञा राणे, सखु आकेरकर, नगरसेविका प्राजक्ता बांदेकर, नयना मांजरेकर, चांदणी कांबळी, एड. रिना पडते आदी उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या आणि आपला संसार कष्टाने हाकणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला या महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले तसेच पाककला स्पर्धा, खेळ पैठणीचा, प्रश्नमंजुषा या स्पर्धात्मक खेळ सुद्धा घेण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश नेमळेकर यांनी केले.

अभिप्राय द्या..