You are currently viewing वेंगुर्ले भाजपाच्या वतीने शरीरसौष्ठवपटू अंकित चा सत्कार.

वेंगुर्ले भाजपाच्या वतीने शरीरसौष्ठवपटू अंकित चा सत्कार.

वेंगुर्ला /-

डिपार्टमेंट ऑफ स्पोटर्स अँड फीजीकल एज्युकेशन मुंबई विद्यापीठ आयोजित सि.के.टी.काॅलेज , पनवेल येथे झालेल्या आंतर विद्यापीठ बेस्ट फिजिक शरीरसौष्ठव स्पर्धेत डिपार्टमेंट ऑफ फिजिकल एज्युकेशनचा बी.पी.एड. प्रथम वर्षाचा विद्यार्थी व वेंगुर्लेतील शरीरसौष्ठवपटू अंकित किशोर सोनसुरकर याने ८० कीलो वजनी गटात तृतीय क्रमांक पटकावत सिंधुदुर्गचा पहिला खेळाडू बनण्याचा मान मिळविला.याबद्दल वेंगुर्ले भाजपा च्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.किशोर सोनसुरकर यांच्या सातेरी व्यायाम शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नगराध्यक्ष राजन गिरप व भाजपाचे प्रदेश का का सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते शाल , पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला . यापूर्वीही अंकित सोनसुरकर याने ज्यु.मि.आशिया २०१७ स्पर्धेत बॅंकाॅक – थायलंड येथे ५ वा क्रमांक मिळविला , तसेच ज्यु.मि.आशिया २०१८ भोपळ – मध्यप्रदेश येथे सहभागी झाला. खर्डेकर श्री २०१८ स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेता , तसेच जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत प्राविण्य मिळविले आहे. पॉवरलिफ्टिंग खेळात राज्यस्तरीय मजल मारली तसेच वेटलिफ्टींग मध्ये जिल्हास्तरीय गोल्ड मेडल प्राप्त केले . तसेच आंतर मुंबई युनिव्हर्सिटी बेस्ट फिजिक ८० किलो वजनी गटात तिसरा क्रमांक मिळविला .अशा स्पर्धा गाजवत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोनाच्या काळात सातेरी व्यामशाळेच्या वतीने ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ले येथे गरजु रुग्णांना ऑक्सिजन काॅन्सस्ट्रेटर ची अनमोल सेवा उपलब्ध करून देण्यात मोठा पुढाकार घेतला .अशा हरहुन्नरी खेळाडूचा सन्मान भाजपा वेंगुर्ले च्या वतीने करण्यात आला .यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक , मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर ,माजी नगरसेवक प्रशांत आपटे , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर , ता उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस , परबवाडा सरपंच पपु परब , किसान मोर्चा चे बाळु प्रभु , अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा , सांस्कृतिक आघाडी चे शैलेश जामदार ,बुथप्रमुख शेखर काणेकर , ओंकार चव्हाण तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू किशोर सोनसुरकर , व्यायामशाळा संचालीका अबोली सोन्सुरकर , राज्य पंच सुधीर हळदणकर , रांगोळीकार पिंटू कुडपकर , रस्सीखेच पंच मनोहर कावले , सिंधुदुर्ग श्री हेमंत चव्हाण , व्यायाम प्रशिक्षक निनाद दिपनाईक , गौतम परब , मोहीत कुमार , वैभव पेठे, साहील बागायतकर ,सोहन पोतदार ,अभि गावडे , हर्ष मोबारकर ,काझीटन डिसोझा , रॅमीज शेख , शुभम गावडे , विक्रांत मठकर , सॅमसंग फर्नांडिस आदी उपस्थित उपस्थित होते.

अभिप्राय द्या..