You are currently viewing आमदार-केसरकरांनी दिला कबबुलबुल गणवेश<br>महिलादिनी सरपंच जानवी परबांच्या उपस्थितीत वाटप

आमदार-केसरकरांनी दिला कबबुलबुल गणवेश
महिलादिनी सरपंच जानवी परबांच्या उपस्थितीत वाटप

वेंगुर्ला /-

आज दि.८ मार्च महिलादिनाचे औचित्य साधून माजी राज्यवित्तमंत्री तथा आमदार दीपकभाई केसरकरांनी जि.प.प्रा. शाळेला दिलेला कबबुलबुल गणवेश तो मातोंड सरपंच जानवी परब यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी स्त्री कर्तुत्वपर भाषणे केली. तसेच शाळेत महिला मेळावा, समुपदेशन सत्र आयोजित करण्यात आले. यावेळी मातोंडच्या सरपंच जानवी परब,शाळा व्यवस्थापन समिती, मातापालक संघ,शिक्षक पालकसंघ, फ्लॉकलीडर वैशाली साबळे, बालताई स्मिता परब,ग्रामस्थ महिला व शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कबमास्टर सुभाष साबळे यांनी केले असून शाळेचे मुख्याध्यापक पवन अहिरे यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा