You are currently viewing कुडाळ नगरपंचायत व युवा फोरम भारत संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथील महिला रुग्णालय येथे आरोग्य शिबिर संपन्न.

कुडाळ नगरपंचायत व युवा फोरम भारत संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथील महिला रुग्णालय येथे आरोग्य शिबिर संपन्न.

कुडाळ /-

आज दि. 8 मार्च रोजी कुडाळ नगरपंचायत व युवा फोरम भारत संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ येथील महिला रुग्णालय येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले या शिबिरास ग्रामस्थांचा चांगल्यापैकी प्रतिसाद लाभला या शिबिरामध्ये हेल्थ रुटीन चेकअप तसेच हिमोग्लोबिन थायरॉईड ब्लड प्रेशर एच आय व्ही हेपिटायटीस असे महिलांची निगडित सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या करण्यात आल्या होत्या. या शिबिरात आज 50 पेक्षा जास्त महिलांनी आपले हेल्थ रुटीन चेकअप करून घेतले या शिबिरास नगरपंचायत चे कार्यकर्ते नगरसेवक व युवा फोरम चे अधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थिती दर्शविली. नगराध्यक्ष सौ आफ्रीन करोल नगरसेविका अक्षदा खटावकर नगरसेविका सई काळप नगरसेविका श्रेया गवांडे नगरसेविका दळवी मॅडम नगरसेविका नयना मांजरेकर नगरसेविका चांदणी कांबळी नगरसेवक उदय मांजरेकर युवा फोरमचे अध्यक्ष यशवर्धन राणे उपाध्यक्ष अमोल निकम सचिव एडवोकेट हितेश कुडाळकर सौरभ शिरसाट शुभम सिंदगीकर रोहित अटक श्रीशा बांदिवडेकर संतोषी घाडी ऐश्वर्या वेंगुर्लेकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई महाराष्ट्र व युवा फोरम भारत संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने आज 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण शिबिर घेण्यात आले यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून कायदेतज्ञ ऍडव्होकेट राजश्री नाईक संगीता यादव मॅडम डॉक्टर विशाखा पाटील मॅडम यांनी मार्गदर्शन केले शिबिरास ही अनेक महिलांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला.

अभिप्राय द्या..