You are currently viewing शिवसेना नेत्यांचे निकटवर्तीय तपास यंत्रणांच्या रडारवर, संजय राऊतांच्या पत्रकार परिषदे आधी छापेमारी.

शिवसेना नेत्यांचे निकटवर्तीय तपास यंत्रणांच्या रडारवर, संजय राऊतांच्या पत्रकार परिषदे आधी छापेमारी.

आदित्य ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या घरावर इन्कम टॅक्सची धाड!छाप्याचे कनेक्शन थेट यशवंत जाधवांशी

मुंबई /-

शिवसेना नेत्यांच्या निकटवर्तीयांवर आज सकाळपासून तपास यंत्रणांने धाडसत्र सुरु केलंय.शिर्डी देवस्थान ट्रस्टचे सदस्य राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकलेत.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे. वांद्रेतील भाभा हॉस्पिटलच्या मागे राहुल कनाल राहतात. त्यांच्या घरावर आयकर विभागाकडून पहाटेपासून छापे टाकण्यात आलेत.राहुल कनाल हे राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जातात, ते शिवसेनेचे पदाधिकारी असून युवासेनेच्या कोअर टीमचे सदस्यही आहेत. तसंच श्री साईबाबा संस्थानचं विश्वस्त पदही त्यांच्याकडे आहे.

संजय कदम यांच्या घरावरही छापे

दुसरीकडे अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्या अंधेरीतील घरावरही आयकर विभागाचे छापे पडलेत. सकाळी पाच वाजल्यापासून आयकर विभागाच्या टीमकडून छापेमारी सुरुय. शिवसेना पदाधिकारी संजय कदमांच्या घराबाहेर जमा झालेत.

आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय तपास यंत्रणा या भाजपची प्रचार यंत्रणा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. महाराष्ट्रावर याआधीही अशी आक्रमण झाली आहेत, मुंबईत निवडणूक लागेल असं कळल्यावर भाजपाला महाविकास आघाडीची भीती वाटायला लागली आहे. म्हणून अशा कारवाया सुरु झाल्या आहेत. केंद्रीय यंत्रणा या आता भाजपाच्या प्रचार यंत्रणा झाल्या आहेत. महाराष्ट्र झुकणार नाही, महाराष्ट्र थांबणार नाही असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय.

प्रतिक्रिया व्यक्त करा