You are currently viewing स्काँर्पिओ आणि स्विफ्ट कारमध्ये समोरासमोर धडक.;दोन्ही कारमधील चालक गंभीर जखमी – कारचे मोठे नुकसान.

स्काँर्पिओ आणि स्विफ्ट कारमध्ये समोरासमोर धडक.;दोन्ही कारमधील चालक गंभीर जखमी – कारचे मोठे नुकसान.

चौके /-

मालवण – कुडाळ नेरुरपार मार्गावर चौके गोड्याचीवाडी बस थांब्याजवळील वळणावर रविवारी सांयंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास मालवण वरुन कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या स्काँर्पिओ कार आणि मालवणच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट कार मध्ये समोरासमोर जोरदार धडक बसून अपघात झाला. दोन्ही कार सांवतवाडीतील असून कारमधील चालकांना गंभीर दुखापत झाली असून कारमधील एअर बॅग्ज फुटल्याने मोठा अनर्थ टळला असल्याचे अपघातग्रस्त कार बघता निदर्शनास येते. दोन्ही कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले असून कारमधील गंभीर युवकाना सावंतवाडी तसेच गोवा बांबोंळी येथे उपचारासाठी नेण्यात आले असून सदर अपघाताची रविवारी उशीरापर्यंत पोलीसात नोंद नव्हती.

अभिप्राय द्या..