You are currently viewing वेर्लेमध्ये भाजपला धक्का वेर्ले उपसरपंच सुभाष राऊळ यांचा आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश.

वेर्लेमध्ये भाजपला धक्का वेर्ले उपसरपंच सुभाष राऊळ यांचा आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश.

सावंतवाडी /-

सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले गावचे उपसरपंच तथा प्रभारी सरपंच श्री. सुभाष राऊळ यांनी आज माडखोल विभागातील भाजपला जबरदस्त हादरा देत, स्थानिक आमदार श्री. दिपकभाई केसरकर यांच्या हस्ते तसेच सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्री. रुपेश राऊळ यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सावंतवाडी येथे माननीय आमदार श्री. दिपकभाई केसरकर यांच्या कार्यालयात शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे भाजपचा बालेकिल्ला असंलेल्या माडखोल विभागात शिवसेनेने आपली नवी मजबूत ताकद निर्माण केलेली आहे. या प्रवेशासाठी शिवसेना उपविभागप्रमुख श्री. दिलीप राऊळ यांनी विशेष प्रयत्न केले.

या कार्यक्रमावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. अशोक दळवी, सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख श्री. रुपेश राऊळ, माडखोल विभाग प्रमुख श्री. पुरुषोत्तम राऊळ, उपविभागप्रमुख श्री. दिलीप राऊळ, ओवळीये सरपंच श्री. विनायक सावंत, सांगेली उपसरपंच श्री. रमाकांत राऊळ श्री. विठ्ठल राऊळ, शाखा प्रमुख श्री. मनोज राऊळ, बाबू शेठये, अनिल लिंगवत, विजय राऊळ, बाबी राऊळ, दिलीप घोगळे, रवी राऊळ, काका राऊळ, अजित राऊळ, अविनाश राऊळ, बाळू चव्हाण, बापू राऊळ, रामकृष्ण राऊळ, आणि बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते.

अभिप्राय द्या..